विधीची माहिती

सगळ्या प्रकारच्या विधींची माहिती खालील प्रमाणे आहे

नारायण नारायणबली विधी

         नारायणबली आणि नागबली हे दोन धार्मिक विधी काही इच्छा पूर्ततेसाठी केले जातात म्हणून ह्या तिघांना काम्य विधी म्हणतात..

  1. अपत्य प्राप्तीसाठी.
  2. पिशाच्चांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी
  3. शाप दर्शविणारी स्वप्ने
  4. मनुष्याचे सर्प जातीशी विशेषत: नागजातीशी संबंध

अपत्य प्राप्तीसाठी

    एखाद्या दांपत्याला अपत्य होत नसेल तर त्या दांपत्याला दुर्देवी मानले जाते. समाजातील माणसे अपत्यहिन व्यक्तींचे भल्या पहाटे मुख पहाण्याचे टाळतात म्हणून प्रत्येक दांपत्याची एकच इच्छा असते की त्यांचे एक तरी मुल वा अपत्य असावे. अपत्याशिवाय कौटुंबिक जीवनही अर्धवट वाटते. मुलांसाठी प्रेम, वात्सल्य ह्या भावना नैसर्गिक आहेत आणि ह्या भावनांची पुर्तता न झाल्यास मनुष्य दु:खी होतो. एक वेळ गरिबी परवडते. आर्थिक सुबत्ता नसली तरी चालते पसंतु अपत्य सुख मात्र प्रत्येक दांपत्याला हवहवेसे वाटते. आजच्या आधुनिक युगात अपत्य प्राप्तीसाठी टेस्टटयुब पध्दतीचा उपयोग केला जातो. दांपत्य कर्ज काढून, परवडत नसले तरी आधुनिक उपाययोजना करवून घेतात. परंतु विविध प्रयत्नानीही सकारात्मक परिणाम मिळत नाहीत तेव्हा निराशेनेच अशी मंडळी फलज्योतिषाकडे धाव घेतात. फलज्योतिषी वैद्यकिय उपायांच्या, अपयशाचा अभ्यास करतात. दांपत्याच्या वैवाहिक विषयी जीवनात दोष नसतील तरच फलज्योतिषही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दे‌ऊ शकतात. कारण रोग असला तर त्याचा उपायही सापडतोच हा नियम लक्षात ठे‌ऊन आमच्या पुर्वजांनी ज्योतिषशास्त्रात उपाय नमूद केलेले आहेत. त्यामुळे अपत्यहीनांच्या समस्या सुटू शकतात. प्रथम फलज्योतिषी पती पत्निच्या जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करतात की अपत्य प्राप्तीची संभावना आहे की नाही. नंतर अपत्य प्राप्ती का होत नाही याचे नेमके कारण शोधुन काढण्याचा ते प्रयत्न करतात. त्या कारणांमध्ये पुढील काही महत्वाची कारणे आहेत.

  1. पुर्वजन्माचा शाप
  2. पिशाच्याच्या त्रासातून मुक्ति
  3. निर्वेश योग इत्यादी (निपुत्रिक योग)

         ज्यावेळी त्यांचा पक्का निर्णय होतो त्यावेळी ते नारायणबली-नागबली ह्या विधीची विधिवत पूजा करण्याचा सल्ला देतात. ह्यानंतर हा विधी व्यवस्थितपणे पार पाडला की अपत्य प्राप्तीची विधी पार पाडणार्‍या दांपत्याला संधी मिळते असा अनुभव अनेक दांपत्यांना आलेला आहे. म्हणून दांपत्याच्या जन्मकुंडलीचे अभ्यास परिक्षण आवश्यक आहे. त्यानंतर दोघांचीही वैद्यकीय तपासणी कुशल डॉक्टरांकडून करणेही आवश्यक आहे. वैद्यकीय तपासणीला नारायण-नागबली ह्या धार्मिक विधीचाही व्यवस्थित जोड मिळाला तर दांपत्याला अपत्य प्राप्ती झाल्याशिवाय राहाणार नाही. नशिबाला प्रयत्नांची जोड तर हवीच.

अपत्यांचे महत्व

         मानवाचा गृहस्थाश्रम संततीशिवाय सफल होत नाही. तो गृहस्थाश्रमातील सौख्याचा ठेवा 'कुलदिपकपुंज' मानला जातो. म्हणूनच महाकवी भवभूतीने म्हटले आहे की,

अंत:करण तत्त्वस्य दंपतया: स्नेहसंस्त्रवात ।
आनंदग्रंथ्री रेकीयं अपत्यमिती पठयते ॥
यस्य वै मृत्युकाले तु व्युच्छिन्ना संततिर्भवेतू !
स वसेन्नरके नित्य पंकंमग्ना करीयता !!

         ऐहिक सुख व पारलौकिक गति ह्या दोन्ही अपत्यलाभानेच मिळतात. या लोकी नानाविध दु:खांनी मनुष्य पोळला जातो. ज्यावेळी शरीरातील दोष हे कारण नसतांनाही संतती प्राप्त होत नाही. अजिबात संतती नसणे, पुत्र नसणे, जिवीत संततीस आरोग्य नसणे, शरीरास कायम रोग पीडा असणे, योगक्षेम व्यस्थित न चालणे, यांस अदृष्ट कारण परंपरा असलीच पाहिजे याचा विचार त्यांनी प्रथम करून ती प्रथम नमूद केली आहेत.

  1. पुर्वजन्मी केलेले विशिष्ट कृत्य (द्रव्यापहरणदि)
  2. या जन्मी केलेल विशिष्ट कृत्य
  3. वामकर्मी अभिचार विशिष्ट कृत्य
  4. पित्तर, आप्त वा इतर संबंधित यास गति नसणे
  5. प्रेत लोकांतील पैशाचिकादिकाची पीडा असणे
  6. नागवध करणे

         दुसर्‍यांचे धन लुबाडणे होय किंवा वारसा हक्काने धन मिळणे, दुसर्‍याचे धन घेतले म्हणजे सर्व झाले असे नव्हे. जसे दुसर्‍यांचे धन घेतले आहे ती व्यक्ती जर हयात नसेल तसेच ती व्यक्ती निपुत्रीक असेल तर त्या व्यक्तीचे श्राध्द करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्या व्यक्तीचा श्राध्द लोप होत असेल तर वरील कारणांपैकी दिलेल्या पीडा ही उत्पन्न हो‌ऊ शकतात.

         ह्या सहा कारणांनी विशेष करून अनपत्यादि दु:खे प्राप्म होतात असे त्यांस आढळून आले. आता वरील कारणांचा खुलासेवार विचार करू. पित्तरास गति नसणे म्हणजे सृष्टीक्रमाप्रमाणे त्यास पितृलोक न मिळणे म्हणजे तृप्ति नसणे यामध्ये पुष्कळ गोष्टी अंतर्भूत आहेत. शास्त्रकारांनी असे ठरविले आहे की, ज्ञानराज्याचे संचालक ऋषी आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थल राज्याचे संचालक देवतागण आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थल राज्याचे संचालक नित्य पित्तर आहेत.
         अर्थात पितरांचे तृप्तीने ऐहीक सुखाचा लाभ होतो. त्यांची तृप्ती म्हणजे त्यांना उद्देशुन श्राध्द करणे. आता श्राध्द म्हणजे काय याचाही विचार क्रम प्राप्तच आहे. श्राध्द या शब्दात श्रध्दा हा मुख्य शब्द आहे. आपला जन्म ज्या कुलात झालेला असतो त्या कुलातील तसेच मातामहादि कुलातील मृत पुर्वजांच्या (प्रेत व पित्तर) तृप्ती करिता तसेच त्यांच्या तृप्तीने लाभणारी सत्‌ संतती व चिरसंपत्ती याकरिता तिलदंभदिकांनी सविधी दिलेल्या अन्नोदकरुप पितृयज्ञाला श्राध्द असे म्हणतात. श्राध्द शिवाय़ कितीही पवित्र व कितीही मृल्यवान पदार्थ पित्तर ग्रहण करू शकत नाहीत श्रध्दापूर्वक असूनही विना मंत्राने दिलेले अन्नोदक पित्तरांना मिळत नाही असे स्कंद पुराण माहेश्वर खंड, कुमारीकाखंड अध्याय ३५/३६ यामध्ये सांगितलेले आहेत. हे पित्तर कमोधिन नाहीत या नित्य पित्तरांचे २१ गण आहेत ते श्राध्द भाग पोहोचविण्याचे काम करतात. श्राध्दादि पितृकार्य करणारा निरोगी, दिर्घायु, सुपुत्रवान, श्रीमान धनोपार्जक असा होतो व परलोकी त्यांस तृप्ती मिळते. म्हणूनच साधन सोडून साध्याची प्राप्ती कशी होणार?

आयु प्रजा धनं विद्या मोक्ष सुखानिच !
प्रयच्छन्ति यथाराज्य नृणां प्रीता: पितामहा: !

         पितृ शापाने संततिविच्छेद होतो. योग्य बांधवांशीही वैर उत्पन्न होते. पशु, द्रव्य यांचा विनाश होतो. मनुष्य व्यसनसधीन होतो अशी दु:खे निर्माण होतात. कुटुंबातील लोक धर्मभ्रष्ट प नितीभ्रष्ट होतात. थोडक्यात म्हणजे घराची काळच नष्ट होते म्हणून या दु:खाच्या नाशा करिता शास्त्रकारांनी उपाय योजना केली आहे की पितरांचे उद्देशाने पवित्र स्थळी, योग्य काळी सत्पात्र पाहून विधीयुक्त प्रारे जे अन्न, आहार, द्रव्यादि अति श्रध्देने दिले असते त्याला श्राध्द असे म्हणतात. तोच हा नारायणबली विधी होय. पित्रार्जित संपत्तीकरीता व कर्तव्य म्हणून त्यांचे वृध्दापकाळी त्यांची सेवा करणे हे जसे कर्तव्य आहे. तसेच मरणोत्तरही त्यांचा अर्यमादि पितृदेवांकरीता आणि जगतपालनकर्त्या विष्णू प्रित्यर्थ तसेच सत्संतती व चिर संपत्ती त्यांच्या लाभाने पूर्ण होणार्‍या गृहस्थ धर्माकरिता हे अनुष्ठान प्रथम वेदानेच निर्मित केले आहे. आपले वंशातील सर्व मृतांत्म्यांना प्रेत लोकांतून पितृलोक मिळावा हाच हा विधी करण्याचा उद्देश आहे. शास्त्रा सांगितलेला जो एकंदर श्राध्द विचार आहे त्यातील हाच भाग प्रामुख्याने आहे.

पुनाम नरकात त्रायते इति पुत्र: ॥

        दुसर्‍यांचे धन लुबाडणे होय किंवा वारसा हक्काने धन मिळणे, दुसर्‍याचे धन घेतले म्हणजे सर्व झाले असे नव्हे. जसे दुसर्‍यांचे धन घेतले आहे ती व्यक्ती जर हयात नसेल तसेच ती व्यक्ती निपुत्रीक असेल तर त्या व्यक्तीचे श्राध्द करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्या व्यक्तीचा श्राध्द लोप होत असेल तर वरील कारणांपैकी दिलेल्या पीडा ही उत्पन्न हो‌ऊ शकतात.

कालसर्पराहू शांती

         कालसर्पराहू शांती हा यज्ञासारखा एकच दिवसाचा आहे. या विधीमध्ये गणपती पूजन , वरून पूजन , पुण्याह वाचन, मातृका पूजन, कालसर्पराहू पूजन , नवग्रह पूजन इत्यादी केले जाते व नवग्रहादी देवतांना उद्देशून हवन , बली प्रदान इत्यादी कर्म केले जाते.
         कालसर्पराहू शांती साठी लागणारे साहित्य - कलश ताम्हाणे चांदीच्या १० नाम प्रतिमा , कालसर्पराहू देवतांच्या प्रतिमा इत्यादी . सदरचे पूजा साहित्य आपणांस आणण्याची आवश्यकता नाही . वरील पूजा साहित्य आमचे जवळील वापरून आम्ही विधी करून देऊ .

कालसर्प योग समज-गैरसमज

         कालसर्प योग शांतिबाबतही बराच गैरसमज आहे, असे का आम्ही सांगत आहोत. ह्याचे कारण सविस्तर देत आहोत, ते पुढील प्रमाणे- ह्या कडे कृपया कोणी दुर्लक्ष करू नये.
तिथी, वार, नक्षत्र, योग, कारण ही पाच अंग म्हणजेच पंचाग. ह्याच पाच अंगापैकी जो जन्माचे वेळेला काही अंगाचां जो काही दोष राहातो तोच दोष घालविणारा विधी म्हणजेच जनन शांति. जनन शांति म्हणजे ज्याप्रमाणे आपण जसे अंगावरील वापरलेले खराब कपडे धुतो नंतर तेच स्वच्छ कपडे आपण जसे परत परिधान करतो, तसेच जनन शांतिचेही तसेच नियम आहेत. ती जनन शांति करण्याची खरे वय आहे, जन्म झाल्यापासून ११ किंवा १२ व्या दिवशी करावी, नंतर त्या बाळाचे बारसे (नामकरण) करावे. पण आज-काल बाळाच्या जन्माच्या आनंदात त्या बाळाचे जन्माचे वेळी जनन शांति आहे की नाही ह्याची चौकशी न करता बारसे (नामकरण) केले जाते. त्यामुळेच पुढे काही त्या बाळाचे कोणत्याही आयुष्यात काही त्रास झाल्यावर (उदा- आरोग्य, शिक्षण, उच्च्‍ा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह आदी त्रास ) आपण त्याची जन्मपत्रिका घे‌ऊन कोणत्याही कुड-बुडया ज्योतिषाकडे जा‌ऊन त्यास काही वरील अडचणीबाबत आपण त्यास काही दोष-त्रास आहे का असे विचारतो. मग तो कमी अभ्यास असलेला ज्योतिषी आपणांस विचारतो की, ह्यांची कालसर्प, अमावास्या, मूळ, ज्येष्ठा आदी शांति आहेत. त्या शांति कधी केलेल्या नसल्यास त्यास आयते कारण मिळते की ह्याची शांति केल्या नसल्यानेच हा त्रास उदभवलेला आहे. त्यामुळेच ह्या शांति करण्यास भाग पाडतो. शांति केल्यानंतर काही २० ते २५ टक्के जणांस त्याचा जरूर फायदा- लाभ होतो. पण ह्याचा अर्थ हाच की कावळा बसण्यास व त्याचवेळी झाडाची फांदी मोडण्यास एकच वेळ ह्या म्हणी प्रमाणेच हेही आहे. पण हे मानने सर्वथा निरर्थक व भ्रम निर्माण करण्यासारखेच आहे. आमचा अनुभव असा आहे की, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येणारे भारतातूनच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागातून येणारे १०० पैकी ८० टक्के येणारे लोक गैरसमजुतीनेच येथे येत असतात ह्यास आम्ही काय म्हणावे त्याचे उत्तर आहे अज्ञान. अजुन आमचा अनुभव असा आहे की, सर्व शांति पुजा करूनही काही जणास फायदा न झाल्यास तेच लोक ज्यांनी पुजा करण्यास सांगितली त्यांना न विचारता तेच लोक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरूजींनाच विचारतात की, आम्ही जी काही आपणाकडे शांति-पुजा केली त्याचा आम्हास काहीच उपयोग झालाच नाही. ह्यास उत्तर काय? ह्याला उत्तर एकच की जर एखाद्या डॉक्टरने जर एखादी गोळी दिल्यावर औषध दुकानदाराचे काम आहे की लिहून दिल्या प्रमाणे गोळया देणे. जर त्या दिलेल्या गोळयांचा जर काही दुष्परिणाम झाल्यास त्याचा नेमका दोष कोणाचे माथी मारावा, ह्यात नेमका दोषी कोण गोळ्या लिहुन देणार्‍या डॉक्टर की लिहून दिल्याप्रमाणे औषधे देणारा औषध दुकानदार हा निर्णय सुज्ञ व योग्य विचार करणार्‍या विचारवंतानीच ठरवावा.

त्रिपिंडी श्राध्द

         त्रिपिंडी श्राध्द म्हणजेच काम्य श्राध्द. ज्या मृत व्यक्तींचे सतत तीन वर्ष विधिपूर्वक श्राध्द केले जात नाही अशा व्यक्तींच्या आत्म्याचे रुपांतर प्रेत योनित होते. अमावास्या पित्तरांचा दिवस असतो. ह्या दिवशी श्राध्द केली जातात. परंतु नवरात्र आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात मृत्युदिवशी त्रिपिंडी श्राध्द करीत नाही.

त्रिपिंडी श्राध्द कोठे आणि कधी करावे ?

         श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, आणि वैशाख महिन्यांच्या शुक्ल आणि वद्य पक्षांच्या पंचमीस, अष्टमीस, एकादशी, चर्तुदशी, आणि अमावास्या ह्या दिवशी पारंपारिक शास्त्र शुध्द पध्दतीने त्रिपिंडी श्राध्द करता येते. सामान्यता सूर्य कन्या किंवा तुळ राशीत १६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत असतो ह्या कालखंडात पित्तरांना पृथ्वीवर मुक्तपणे भ्रमण करण्याची परवानगी असते असा समज आहे म्हणून वर उल्लेखिलेला कालखंड त्रिपिडी विधिसाठी अधिक फायदेशीर असतो. जर समस्या अधिक बिकट आणि तीव्र असतील तर ’गोदाविवेक दर्श’ ह्या पुस्तकाचा संदर्भ घेण्यास काहीच अडचण नाही. हे पुस्तक मार्गदर्शनासाठी सुरेख आहे. त्रिपिडी श्राध्द फक्त त्रिंबकेश्वरीच करावे.
         त्रिपिंडी श्राध्द वर्षातून केव्हाही त्रिबंकेश्वरीच शास्त्रशुध्द विधिने करता येते. ह्या वचनाला आपल्या पारंपारिक शास्त्राचा पांठिबा आहे. कवि कवीदासांनी रचलेल्या महान आणि श्रेष्ठ काव्यात म्हणजेच रघुवंशात त्रिंबकेश्वरचा उल्लेख महेश्वर असा केला आहे. ह्या काव्यात महेश्वराला प्रार्थना केली आहे की त्याने प्रेतयोगी अस्तित्वात असणार्‍या आत्म्यांच्या कुकर्मांना नष्ट करून त्यांना मुक्ती द्यावी.
         त्र्यंबंकेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये कुशावर्त नावाचे एक तीर्थ म्हणजे सरोवर आहे. ह्या सरोवराजवळ एक मोठे अश्वत्याचे म्हणजे पिंपळाचे झाड. ह्या झाडाजवळ ’करपदीकेश्वराचे’ एक मंदीर आहे. त्रिपिंडी श्राध्द ह्या मंदिराजवळ केल्यास फार लाभदायक होते असे म्हणतात.
         त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोतीटर अंतरावर एक स्थान आहे त्या स्थानास पिशाच्च विमोचन तीर्थ म्हणून ओळखले जाते. जर ह्या ठिकाणी त्रिपिंडी श्राध्दाचा विधीपूर्वक विधी केला तर पिशांच्चांचा त्रास नाहीसा होतो अशी मान्यता आहे. ह्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे.
         जर तिर्थ श्राध्द आणि त्रिपिंडी श्राध्द शास्त्रशुध्द पध्दतीने करायचे असेल तर प्रथम त्रिपिंडी श्राध्दाचा विधी करावयाचा असतो आणि नंतर तिर्थ श्राध्दाचा विधी करावयाचा असतो. प्रेत योनी तीन प्रकारच्या असतात. त्यांची नावे तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी अशी आहेत.
         मनुष्याच्या स्वभावानुसार गुणानुसार त्यांचे रुपांतर त्याच्या मृत्युनंतर त्या योनीमध्ये होते. त्रिपिंडी मृत्युनंतर प्रेत योनीत पिशाच्चापासून सुटका करून घेण्यासाठी केले जाते. त्रिपिंडी श्राध्दाचा विधीवत विधी करण्यापूर्वी शरीर शुध्दतेसाठी गंगामिलन-गंबास्नान करावे लागते ह्या श्राध्दासाठी क्षौर म्हणजे मुंडण करण्याची ’डोक्यावरचे केस काढण्याची’ आवश्यकता नसते परंतु पायसिंध्दत्ताचा विधी संपन्न करतांना सामान्यत: क्षौर केले जाते अशी प्रथाच रुढ झालेली आहे. त्रिपिंडी श्राध्द करतांना ब्रम्हा, विष्णु, आणि महेश ह्या देवतांच्या प्रतिमा करून त्यांची मनोभावे पुजा करण्याची पध्दत आपल्या पारंपारिक शास्त्रात आहे. तीन ब्राम्हणांना मंत्रोंचारणाचा आणि ह्या तीन देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अधिकार दिलेला आहे. जर त्रास देणार्‍या प्रेतयोनीचे नाव आपल्याला माहित नसेल तर ’अलारिष्टा गोत्रा’ ह्या शब्दाचा उपयोग करतात. हे श्राध्द एका विशिष्ट प्रेतयोनीला या आत्म्याला संबोधूनच केले जाते. ह्या विधीत तीन वेगळे जवसाच्या पिठाचे, तिळाचे आणि भाताचे (तांदूळ शिजवून) पिंड करतात. हे पिंड करतांना त्यात साखर आणि तुपही घालतात. जवसाच्या पिठाचा पिंड तमोगुणी मृतात्म्याला अर्पण करतात. पुजा झाल्यानंतर हे सर्व पिंड, महालिंगाचा नैवेद्य इत्यादी देवासमोर ठेवतात ही कृती आपल्या कुटूंबाला त्रास देणार्‍या पिशाच्यांना खुश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या कुकर्माचा त्रास आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होवू नये म्हणून आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे ह्या प्रेतात्म्याला चिंरशांती मिळाल्याच्या हेतुनेच केली जाते. सोने, चांदी, तांबे, तांदूळ, जवस, काळे तीळ, उडिद, खडावा-पादुका किंवा गायीचे दान करतात किंवा त्यांच्या किंमती‌एवढे धन दान करतात. त्यानंतर ब्राम्हण भोजनात विवाहित स्त्रियांनाही बोलावले जाते अशा पध्दतीने त्रिपिंडी श्राध्दाचा विधी फक्त त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षाच्या कोणत्याही दिवशी करता येतो असे आपल्या धर्माशास्त्राचे म्हणणे आहे.